(नवी दिल्ली)
आसाममध्ये कॅन्सर उपचारांत क्रांती घडवणारे डॉक्टर आर. रवी कन्नन यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. कन्नन हे मुळचे चेन्नईचे आहेत, त्यांनी आसाममध्ये कॅन्सर उपचारात फार मोठे कार्य उभे केले आहे. कन्नन यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. डॉ. कन्नन हे मुळचे चेन्नईचे आहेत, त्यांनी आसाममध्ये कॅन्सर उपचारात फार मोठे कार्य उभे केले आहे. मॅगसेसे पुरस्कार हा आशियातील नोबेल पुरस्कार मानला जातो. या पुरस्काराच्या ‘हिरो फॉर होलिस्टिक हेल्थकेयर’ या श्रेणीसाठी रवी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. कन्नन यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे.
We are proud to present the 2023 Ramon Magsaysay Awardees. For more information, visit https://t.co/13iyCwwUpq.#RamonMagsaysayAward #GreatnessOfSpirit #TransformativeLeadership #65thRamonMagsaysayAwards pic.twitter.com/gPrgRvZ9p5
— Ramon Magsaysay Award (@MagsaysayAward) August 31, 2023
कन्नन यांनी सुरुवातीला कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ चेन्नईमध्ये काम केले. त्यानंतर ते आसाममधील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये २००७ पासून रुजू झाले. कन्नन यांच्या नेतृत्वाखाली हे हॉस्पिटल सुसज्ज बनले. त्यांनी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार, दूर वरून येणाऱ्या रुग्णांसाठी राहाण्याची आणि सेवेची सुविधा, घरातून सुश्रुषा असे बरेच उपक्रम सुरू केले.
रॅमन मॅगसेसे अवार्डीज फाऊंडेशनने म्हटले आहे, “लोकसेवेसाठी त्यांनी जे योगदान दिले आहे, त्याची आम्ही दखल घेतो. लोककेंद्री, गरिबांच्यासाठी कॅन्सर उपचार सुरू करताना त्यांनी कोणतीही अपेक्षा ठेवली नव्हती. आसाममधील लाखो लोकांसाठी ते आशेचा किरण बनले आहेत. ”
या भारतीयांना मिळाले मॅगसेसे पुरस्कार
आतापर्यंत 60 कर्तृत्ववान भारतीयांचा मॅगसेसे पुरस्काराने गौरव केला गेला आहे. त्यापैकी विनोबा भावे, मदर टेरेसा, किरण बेदी, डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे, अरविंद केजरीवाल, सोनम वंगचूक, रवीश कुमार ही काही प्रसिद्ध नावं