रत्नागिरी : जे . एस . डब्लू फाउंडेशन जयगड पोर्ट लि., जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध विभाग, शासकीय रुग्णालय रत्नागिरी, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई आणि भक्त श्रेष्ठ कमलाकर पंथ वालावलकर रुग्णालय डेरवणमार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त जाणीव जागृती व HIV ची तपासणी आणि ट्रक चालकांना कर्करोगाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थित ट्रक चालकांनी सहभाग घेतला आणि HIV तपासणी केली.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जे. एस. डब्लू जयगड पोर्ट लि.चे ऑपरेशन आणि लॉजिस्टिक डिपार्टमेंट हेड श्री. समीर गायकवाड उपस्थित होते. कोविड काळात औद्योगिक सारथी ( ट्रक चालक ) यांचे अत्यावश्यक सेवा सुविधा पोहचविण्यास महत्वाचे योगदान आहे. ट्रक चालकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन समीर गायकवाड यांनी केले.
या प्रसंगी सी. एस. आर विभाग प्रमुख अनिल दधिच यांनी ट्रक पार्किंगमध्ये सी. एस. आरमार्फत चालविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचा फायदा घ्या, असे आवाहन केले. जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाचे राहुल खरात यांनी ट्रक चालकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ट्रक चालकांनी घाबरून न जाता खबरदारी घेणे किती गरजेचे आहे हे समजावून सांगितले.
जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या विलास म्हस्के यांनी आपल्या खास शैलीत विविध गोष्टींच्या आधारे एड्स पासून स्वतःचा बचाव कसा करू शकतो हे सांगितले. यावेळी डॉ . श्रद्धा राऊत ( मेडिकल ऑफिसर – टाटा मेमोरियल सेंटर मुंबई आणि भक्त श्रेष्ठ कमलाकर पंथ वालावलकर रुग्णालय डेरवण ) यांनी ट्रक चालकांना मौखिक कर्करोगाविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या वेळी समीर गायकवाड, अनिल दधिच, गौरेश जोगळेकर, निलेश वाबळे, राहुल खरात, विलास म्हस्के, सचिन पोकळे, दिलीप पांचाळ, ममता खांबे, अमोल सावंत, डॉ. प्राची वाडकर, योगिता महाकाळ, तेजस महाकाळ आणि तेजस कवठेकर उपस्थित होते. तसेच रिंकेश झगडे संतोष घाटे अन्नपूर्णा बचतगट यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.