(देवरूख / सुरेश सप्रे)
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रिचा डोंगरभाग, दऱ्या खोऱ्यातील नयनरम्य परिसर, हिरवा गार निसर्ग, पावसाळ्यात कोसळणारे धबधबे, ऐतिहासिक गडकिल्ले, लेणी, कातळशिल्प, विस्तिर्ण समुद्र किनारा आदीनी पर्यटकांना आकर्षित केले आहे.
जिल्ह्याच्या पर्यटनदृष्ट्या अधिकाधिक विकास झाला तर मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी आम. शेखर निकम यांनी पाठपुरावा केलेने चिपळूण – संगमेश्वर मतदार संघातील पर्यटन स्थळे विकसित करणेसाठी मुंबई सह्याद्री अतिथी गृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपस्थितीत आढावा बैठक घेऊन या तालुक्यातील पर्यटन स्थळे विकसित करणेसाठी विविध योजनांमधून निधी उपलब करण्यात येईल अशी ग्वाही ना. अजित पवार यांनी दिली..
यात चिपळूण तालुक्यातील – 1. अनारी, 2. दळवटणे, 3. गांधारेश्वर, 4. अडरे, 5. गोवळकोट गड, 6. कोळकेवाडी दुर्ग, 7. भैरवगड, 8. परशुराम मंदिर, 9. डेरवण, 10. सवतसडा, 11. टेरव येथील श्री कुलस्वामिनी भवानी, वाघजाई देवस्थान, 12. गोवळकोट येथील श्री देवी करंजेश्वरी मंदीर परिसर, 13. पांडव कालीन लेणी / पीर बाबा दर्गा या पर्यटन स्थळांचा तर
संगमेश्वर तालुक्यातील – 1. तळवडे (टिकळेश्वर मंदिर परसिर), 2. भवनागड, 3. प्रचितगड, 4. महिपतगड, 5. संगमेश्वर कसबा परिसर, 6. श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसर, 7. कडवई या स्थळांचा समावेश आहे.
जिल्ह्याच्या पर्यटनदृष्ट्या अधिकाधिक विकास झाला तर मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या अनुषंगे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी पर्यटन स्थळांचा विकासासंदर्भातील प्रस्तावित कामे व नवीन प्रस्तावित कामे होण्यासाठी मा. अजितदादा पवार साहेबांना आपल्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यास सूचित केले होते. या अनुषंगाने संगमेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथील आर्च ब्रीज व श्रीक्षेत्र टिकळेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण करणे या प्रस्तावित कामांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी असे पर्यटन विभागास मा. अजितदादा पवार यांनी निर्देशित केले आहे.
त्याचबरोबर बैठकीवेळी संगमेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर परिसर विकसित करणे (10 कोटी) आणि चिपळूण शहरातील श्रीक्षेत्र गांधारेश्वर परिसर सुशोभिकरण करणे (4 कोटी) याकरीता आधुनिक पध्दतीचा विकास आराखडा लवकरात लवकर तयार करावा असे मा. अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना सूचित केले.
त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत जी कामे मंजूर आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक सुशोभिकरण करणे (5 कोटी), श्रीक्षेत्र मार्लेश्वर परिसर सुशोभिकरण करणे (4 कोटी 49 लाख), महिपतगड सुशोभिकरण करणे (3 कोटी 50 लाख) या मंजूर कामांचा सुसज्ज आधुनिक आराखडा लवकरात लवकर करुन घ्यावा व सादर करणेचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
या बैठकीला मा. आमदार दत्तात्रय भरणे, आमदार शेखर निकम, अप्पर मुख्य सचिव-वित्त विभाग, अप्पर मुख्य सचिव-महसूल विभाग, प्रधान सचिव-नगर विकास, प्रधान सचिव- नियोजन विभाग, प्रधान सचिव-पर्यटन विभाग, व्यवस्थापिकीय संचालक-महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जिल्हाधिकार (रत्नागिरी) व्ही.सी.द्वारे, जिल्हानियोज अधिकारी (रत्नागिरी) कार्यकारी अभियता सार्वजनिक बाधंकाम विभाग (रत्नागिरी) व् उपस्थित होते.
या बैठकीत पर्यटनदृष्ट्या कोकणातील विशेषत: चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील (जि.रत्नागिरी) प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत विकासकामांचा आढावा घेऊन पर्यटनदृष्ट्या अधिकाधिक विकास होण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. या बद्दल आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे आभार मानले.