ऋतुजा कुलकर्णी, रत्नागिरी
दिड वर्षांची मोठ्ठी सुट्टी
आली आता संपत !
पुन्हा शाळा ;पुन्हा अभ्यास
येणार खरी रंगत !!
खूप खेळलो , आराम केला
हवी आता शिस्त !
आई बाबांची सुद्धा आहे
शाळेवरतीच भिस्त !!
घोकंपट्टी, पाठांतर
शाळेतच चांगले होते !
सर, मॅडम यांच्यासोबत
खरे शिक्षण मिळते !!
शाळा सुरू झाली म्हणून
वाटतेय खरच मजा !
निघून जा कोरोना तू
नको पुन्हा सजा !!
मित्र आता भेटतील सारे
होतील गप्पा दुरुन !!
मस्ती तर करणारच आम्ही
सगळे नियम पाळून !!