(खेड / भरत निकम)
खोंडे येथील फ्लिपकार्ट डिलिवरी कार्यालयातून पार्सल चोरीला गेली आहे. हि घटना १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११:४५ च्या सूमारास घडली होती.शोध घेतला असता ते न मिळाल्याने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल संतोष पदूमले (वय २४) यांच्याकडे फ्लिपकार्ट कंपनीचे डिलीवरीचे काम आहे. भडगाव खोंडे ग्रामपंचायत हद्दीत तो कार्यालय चालवतो. अनेक पार्सल येथे ग्राहकांना पोच करण्यासाठी येत असतात. मोटो जी-३२ माॅडेलचे मोबाईल पार्सल ही आलेले होते. त्याची किंमत २ हजार ४५ इतकी असून अज्ञात चोरट्याने ते चोरुन नेले आहे. याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर २५५/२०२३ नुसार भादवि कलम ३७९ अन्वये अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.