(कोलंबो)
आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने नेपाळचा २२८ धावांनी दारुण पराभव करत दिमाखात सुरुवात केली. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या मोबदलयात ३४२ धावांचा डोंगर उभारला होता. पाकिस्तानच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळचा संघ अवघ्या १०४ धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून बाबर आझम याने १५१ धावांची खेळी केली तर इफ्तिकार अहमद याने १०९ धावांचे महत्वाचे योगदान दिले.
पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया चषक 2023 ची सुरुवात विक्रमी विजयाने केली आहे. या सामन्यात पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांनी शानदार शतके झळकावली. या जोरावर पाकिस्तान संघाने २३८ धावांच्या फरकाने विक्रमी विजयाची नोंद केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत ६ गडी गमावून ३४२ धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने १५१ आणि इफ्तिखार अहमदने नाबाद १०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ २३.४ षटकांत १०४ धावांवर गारद झाला. कर्णधार बाबर आणि इफ्तिखार अहमद यांनी पाचव्या विकेटसाठी १३१ चेंडूत २१४ धावांची भागीदारी केली. दोन्ही देशांमधील हा पहिलाच एकदिवसीय सामना होता आणि पाकिस्तानने नेपाळच्या गोलंदाजांच्या कमी अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. फखर जमान १४ धावा करून बाद झाला तर इमाम उल हक ५ धावा करून बाद झाला. यानंतर बाबर आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. रिझवान ५० चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ४४ धावा करून धावबाद झाला. यानंतर आलेला आघा सलमान ५ धावा करून संदीप लामिछानेचा बळी ठरला. यानंतर मुलतानमध्ये बाबर आणि इफ्तिखारचे वादळ पाहायला मिळाले.
बाबरने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १९वे शतक झळकावले. १३१ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १५१ धावा करून तो बाद झाला. त्याचवेळी इफ्तिखारने ६७ चेंडूत आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. इफ्तिखारने ७१ चेंडूंत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०९ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. शादाब ४ धावा करून नाबाद राहिला. नेपाळकडून सोमपाल कामीने २ बळी घेतले. त्याचवेळी करण केसी आणि लामिछाने यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.