(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागाच्यावतीने शालेय परिसरातील विद्यार्थी व नागरिकांसाठी आधार नोंदणी व आधारकार्ड अपडेशन कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. हा कॅम्प अजून आठवडाभर चालणार आहे. परिसरातील ज्या विद्यार्थ्यांना अथवा नागरिकांना आधार नोंदणी तसेच आधार अपडेशनसाठी( अद्ययावत) करण्यासाठी महत्वपूर्ण कॅम्प जाकादेवी येथे सुरू झाला असून या कॅम्पचा लाभ परिसरातील शालेय विद्यार्थी व या विभागातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आयोजित आधार कॅम्पमध्ये आधार ऑपरेटर म्हणून श्री. दिपक प्रभाकर आपटे हे काम पाहत आहेत. हा कॅम्प २८ ऑगस्ट पासून पुढील दहा दिवस कामकाजाचे असल्याचेही श्री.दिपक आपटे यांनी सांगितले. एज्युकेशन डिपार्टमेंट आणि विद्या ऑनलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कॅम्प सुरू झाला आहे. या कॅम्पच्या यशस्वीरीतेसाठी शिक्षण विभाग रत्नागिरी व जाकादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.नामदेव वाघमारे यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चांगली सेवा उपलब्ध करून दिली आहे