(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील तेऱ्ये गावचे प्रसिद्ध गणेश मूर्तीकार श्री राजेंद्र दत्ताराम बाईत यांच्या गणेश शाळेला 45 वर्ष पूर्ण झाली असून 46 वर्षात पदार्पण केले आहे. पूर्वी वडील कैलासवासी दत्ताराम रावजी बाईत हे गेले अनेक वर्ष शाडूमातीपासून विविध मूर्ती घडवायचे. तसेच हाती कामही करायचे. त्यांच्या सहवासात राहून मुलगा राजेंद्र हा गणपतीच्या कामात उत्तम मूर्तिकार बनला. वडीलांच्या निधनानंतर राजेंद्र हा घराचा डोलारा सांभाळत होता.
या कारखान्यात 350 हुन अधिक गणेशमूर्ती त्यांनी साकारलेल्या आहेत. सध्या कारखान्यात उगवता तारा म्हणून हर्ष राजेंद्र बाईक हा मूर्ती कलेतून विशेषता: रेखणी आदींचे उत्तम कला सादर करताना दिसतात. तर मामा विष्णू जीवा घडशी, वहिनी सौ. इच्छा आकांक्षा देवळे, ओंकार गावडे, सिद्धेश गावडे, गौरव भुरवणे आदींचे सहकार्य लाभत आहे. तसेच पत्नीचे देखील सर्वतोपरी पाठबळ लाभत आहे.
या मूर्ती शाळेत सर्वात मोठा गणपती चार फूट इतका आहे. गणपतींना कापसाळ, नायरी, निवळी, शिवणे, बुरंबी, सोनवणे, करंबे, आधी गावात गणपती मोठ्या भक्ती भावाने लोक नेत असतात. सध्या हर्ष व वडील राजेंद्र या दोघांच्या उत्कृष्ट रंग कलेमुळे गणेश मूर्तीना विशेष मागणी होत आहे. गणपती पाहायला येणारे लोक रंगकाम केलेल्या मूर्तींना जास्त पसंती दर्शवीत आहेत.