(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोक गोताड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आगरनरळ ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच पार पडली. सदर सभेमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आलीअनेक विकास कामे मार्गी लागल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. सदर सभेमध्ये सामाजिक कार्यकर्ते व उपसरपंच श्री अशोक पुनाजी गोताड यांची आगरनरळ गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या निवडी वेळी सरपंच सौ. अनुष्का खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.सौरभ लवंदे, सौ वर्षा गोताड, सौ. श्रेया गोताड, श्री प्रकाश कांबळे, माजी सरपंच व पंचायत समितीचे धडाडीचे सक्रिय सदस्य श्री.अभय खेडेकर, महात्मा गांधी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष विजय गोताड संत गाडगेबाबा समितीचे अध्यक्ष श्रीधर महाकाळ, वासुदेव गोताड, दिनेश महाकाळ, सदानंद गोताड, महेंद्र ठोंबरे विकास दिवेकर व बहुसंख्या उपस्थित होते. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री अशोक गोताड यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.