रत्नागिरी २४ न्यूज l हेडलाईन्स l १ डिसेंबर
करोना संसर्गाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अधिक सतर्क झालं असून लसीकरण, बूस्टर डोस याबाबत वेगवान पावले टाकण्यात येत आहेत.
चिंताजनक! ठाणे मातोश्री वृद्धाश्रमात आणखी १७ जण करोना पॉझिटिव्ह; तीन दिवसांत ७९ बाधित
अभिनेता संजय दत्तने आपली बॅड बॉय ही इमेज केव्हाच पुसून टाकली असून संजय आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची अरुणाचल प्रदेशचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाने यावेळी चार खेळाडूंना रिटेन करत सर्वांनाच धक्का दिला. कारण यापूर्वी मुंबईचा संघ फक्त दोनच खेळाडूंना रिटेन केल, असे मत वर्तवले जात होते. मुंबईच्या संघाने यावेळी कर्णधार रोहित शर्माला १६ कोटी रुपये मोजत आपल्या संघात स्थान दिले आहे. रोहितबरोबर यावेळी मुबंई इंडियन्सने जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना संघात कायम ठेवले आहे.
मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख, अशोक चव्हाणांनी मानले राज्य सरकारचे आभार
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबत कौशल्य आधारित शिक्षण मिळणार, राज्य सरकारचा इन्फोसिस कंपनीसोबत सांमजस्य करार
सलग दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर वाढला, गेल्या वर्षीच्या तुलनेत जीडीपी उणे 7.4 वरुन 8.4 टक्क्यांवर
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाला कारभार पाहण्याची परवानगी; राज्य सरकारनं नेमलेल्या मंडळाचे उच्च न्यायालयानं गोठवले होते अधिकार
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर; अनुयायांनी चैत्यभूमी, दादर येथे न येता घरी राहूनच अभिवादन करण्याचे आवाहन
उसाने भरलेली ट्रॉली घरावर कोसळली, 55 वर्षीय आजीसह 8 वर्षांच्या नातीचा मृत्यू; परभणीत घडली ही हृदयद्रावक घटना
ममता बॅनर्जी-शिवसेना नेत्यांमध्ये बैठक, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी घेतली मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट
स्वतंत्र विदर्भाची मागणी: विदर्भवासियांची इच्छा अधुरीच राहणार, वेगळा ‘विदर्भ’ राज्य होणार नाही; केंद्र सरकारने संसदेला दिली माहिती
गायिका शाल्मली खोलगडे अडकली लग्नाच्या बेडीत, मुंबईत मिक्सिंग आणि मास्टरिंग इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लग्नगाठ
राज्यात मंगळवारी 678 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 942 रुग्ण झाले कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के
अफ्रिकेसह जोखमीच्या देशातून महाराष्ट्रात आलेले सहा प्रवासी कोरोनाबाधित; आरोग्य विभागाने दिली माहिती
लसवंतांनाच करता येणार रिक्षा-टॅक्सी प्रवास; राज्यातील सर्व ‘आरटीओं’ना परिवहन आयुक्तांच्या तपासणीच्या सूचना
कौशल्य शिक्षणासाठी ‘इन्फोसिस’ची मदत; राज्यातील ४० लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लाभ; उदय सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची दिली माहिती
राज्यात जोरदार पावसाचा अंदाज; पुढील तीन दिवस वातावरण ढगाळ; दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये काम करणाऱ्या कष्टकरी माथाडी कामगारांचे राहणीमान उंचावणार; चाळीतून थेट ४० मजल्याच्या टॉवरमध्ये त्यांना घरं मिळणार
विलीनीकरणाच्या मागणीसाठी महिन्याभरापासून सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे ४३९ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले; प्रवाशांचे हाल कायम
सीआयडीकडून सलग दुसऱ्या दिवशी परमबीर सिंह यांची चौकशी; तीन गुन्ह्यांमधील चौकशी प्रक्रिया पूर्ण
सहकारी बँकांच्या भरतीमध्ये संचालकांच्या नातेवाईकांना बंदी; घराणेशाही रोखण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय
चाचण्यांची संख्या वाढवा; ‘ओमिक्रोन’ला रोखण्यासाठी केंद्राचे राज्य सरकारांना आदेश; देशातील विविध विमानतळांवर उतरणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवणार
धरणसुरक्षा विधेयकावरील चर्चा लांबणीवर; विरोधक नसल्याने विधेयक मांडणे योग्य नाही; केंद्राची भूमिका
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट ; श्रेयस, राहुल, रशीद संघमुक्त ; हार्दिक, इशानऐवजी मुंबईची सूर्यकुमारला पसंती
मुक्त करण्यात आलेल्या खेळाडूंना जानेवारीत होणाऱ्या भव्य लिलाव प्रक्रियेत संघांना पुन्हा खरेदी करता येऊ शकेल.
*रत्नागिरी 24 तास*
*अपडेट रहा, स्मार्ट बना…!*
*www.ratnagiri24taas.com*
*l ज्ञान l मनोरंजन l आरोग्य l टिप्स-ट्रीक्स l*
https://bit.ly/2XjFLVE
*………………………………………….*
*व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा* https://wa.me/919860785075?text=Join