(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथिल ग्रुप ग्रामपंचायत तरवळ/आगवे च्या अखत्यारीत येणाऱ्या विविध प्रकारच्या विकास कामांचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना श्री उदय सामंत यांच्या हस्ते दिनांक २६ ऑगस्ट रोजी पार पडले.
ग्रुप ग्रामपंचायत तरवळ/आगवे यांच्या वतीने उद्योग मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ना उदय सामंत यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तरवळ व आगवे गावातील प्रस्तावित विकास कामे त्यांचे भूमिपूजन करणे असा हा पूर्वनियोजित दौरा होता. या प्रसंगी उद्योग मंत्री ना उदय सामंत यांनी सांगितले की तरवळ आणि आगवे या गावांशी माझे अगदी जवळचे नाते आहे, त्यामुळे या दोन्ही गावांचा विकास करण्यासाठी मी कायमच तत्पर असतो, या गावाने मला माझ्या पहिल्या आमदारकीच्या निवडणुकीपासून ते आता मी जिल्ह्याचा पालकमंत्री होईपर्यंत खूप प्रेम दिले आहे, त्यामूळे माझे इतर सर्व दौरे रद्द करून मी या कार्यक्रमासाठी आवर्जून आलो आहे.