(संगलट-खेड / इक्बाल जमादार)
यंदाच्या शैक्षणिक वर्षात १० सप्टेंबर रोजी शाळांनी आजी-आजोबा दिवस साजरा करावा, असे आदेश गेल्या फेब्रुवारीमध्ये शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई- वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्याची संपूर्ण जबाबदारी आजी-आजोबांवर असते. विद्यार्थी हे शाळेनंतरचा घरातला जास्त वेळ ते आजी-आजोबांसोबत
घालवतात. आजी-आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते. म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळात महत्त्वपूर्ण असून हे नाते पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी आहे.
शाळेतील अनुभवासह आजी-आजोबांचे अनुभव त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती या गोष्टी पाल्याच्या जडणघडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून जारी केले आहे.
आजी-आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पागोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख व्हावी यासाठी आजी-आजोबा दिवस शाळेत साजरा करावा. संस्कारपूर्णतेच्या दृष्टीने हे गरजेचे असल्याचे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या रविवारी आजी-आजोबा दिवस शाळांत साजरा करावा, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने फेब्रुवारीमध्ये जारी केले आहे