(चिपळूण)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी- पालवणच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव २०२३-२४ अभ्यासक्रमा अंतर्गत भूमिनिष्ठ गटाच्या कल्पेश मांडवकर, सुयश जाधव, राहुल घाग, संतोष कांडार, आनंद विंचू, प्रथमेश सावळे, संतोष माने, ज्ञानेश्वर बामणे, प्रथमेश भोसले, यश पोटफोडे, राकेश हिरगोंड, संकेत बलाढ्ये यांनी पुर्ण प्राथमिक केंद्र शाळा, आबिटगाव येथे शाळेतील मुलांच्या कला जोपासण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात “शेती काळाची गरज” या विषयांवर निबंलेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेऊन चांगला प्रतिसाद दर्शविला.या उपक्रमा करीता कृषीदूतांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जोशी मॅडम तसेच इतर शिक्षक वर्गाचे चांगले सहकार्य लाभले.