( मुंबई / किशोर गावडे )
“शिक्षण हा प्रगतिशील जीवनाचा पाया आहे. जेवढा पाया भक्कम तेवढे यश पक्के असते. शिक्षणातून आत्मविश्वास वाढतो. आणि त्यामुळे शिक्षणाची वाट कधी सोडू नका. यासाठी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना भविष्यात जर काही मदत लागेल ती मदत आपण निश्चित करू”, असे प्रतिपादन ईशान्य मुंबई शिवसेना विभाग प्रमुख, माजी आमदार अशोक पाटील यांनी गांवदेवी रोड भांडुप येथे केले.
शिवसेना शाखा क्रमांक 109 आणि 110 या प्रभागातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोरया हॉलमध्ये संपन्न झाला. त्यावेळी अशोक पाटील मार्गदर्शन पण बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन उपविभाग प्रमुख प्रकाश माने, भूषण पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख संदीप कुंभार व जेयरीश सिल्वा यांनी उत्कृष्टरीत्या केले होते.
बारावी परीक्षेत सर्वाधिक टक्के गुण प्राप्त केलेल्या शीतल नरेंद्र चौहान या विद्यार्थिनीला लॅपटॉप तर इयत्ता दहावी मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या हेतवी सुनील भानुशाली या विद्यार्थिनीला आकर्षक टॅब देऊन गौरविण्यात आले. तर 316 विद्यार्थी विद्यार्थिनींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र, फोल्डर व व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महिला विभाग प्रमुख राजश्री मादंविलकर, भांडुप विधान संघटक नेहा पाटकर, यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात आपण सातत्य राखून जिद्दीच्या बळावर शिक्षणात उत्तम प्रगती करत रहा. अशा शब्दात विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला चंद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्याने भारतीयांची शान वाढली गेली. भारताने अवकाश क्षेत्रात इतिहास घडवल्याने यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय…. झेंडा उंचा रहे हमारा… वंदे मातरम…अशा घोषणा देऊन प्रचंड जल्लोष केला. यावेळी वातावरण प्रफुल्लित झालेले पहायला मिळाले.
उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांच्या सहकार्याने उपस्थित विद्यार्थ्यांना पेढ्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर, भांडुप विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे सर्व पुरुष व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन नेहा पाटकर व संदीप कुंभार यांनी केले.