( जैतापूर / वार्ताहर )
जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी यांनी उपक्रमांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. या मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मंडळाचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. जैतापूरचा राजा सार्वजानिक गणेशोत्सव मंडळ आयोजित आणि इंडियन रेडक्रॉस रक्तपेढ़ी रत्नागिरीच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराला जैतापुर मध्ये उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.
जैतापुर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित या रक्तदान शिबिराचा शुभारंभ राजापूर पंचायत समितिचे गटविकास अधिकारी विवेक गुंडपाटिल, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बैंक संचालक अमजदभाई बोरकर,जैतापूरचे लोकनियुक्त सरपंच राजप्रसाद राऊत,श्री देव वेताळ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशभाई मांजरेकर,उपाध्यक्ष मनोहर पावस्कर,जैतापूर जमातुल मुस्लिमीन कमिटी अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध हॉटेल कोकण स्वाद मालक जलालभाई काझी, प्राथमिक आरोग्य केन्द्र जैतापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सर्वेश रुमडे,रेडक्रॉस रक्तपेढ़ीचे डॉ.पुष्कराज करंदीकर, यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलनाने आणि श्री श्री गणरायाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या रक्तदान शिबिरामध्ये जैतापूर पंचक्रोशीतील सुमारे 40पेक्षा अधिक रक्तदात्यानी यावेळी रक्तदान केले. तर नोंदणी केलेल्यांपैकी 20 दाते अपात्र ठरले.
यावेळी मंडळाचे सल्लागार गिरीश करगुटकर, राजन लाड, राजेंद्रप्रसाद राऊत, मंडळाचे अध्यक्ष राकेश दांडेकर, सचिव सुनिल करगुटकर, उपाध्यक्ष महेश नारकर, श्रीकृष्ण राऊत, रेशम लाड़, मंगल मयेकर, प्रकाश नार्वेकर, हर्षद मांजरेकर, प्रसाद माजरेकर, स्वप्निल सोगम, शैलजा मांजरेकर, प्रियांका नार्वेकर, सिमरन माजरेकर, अनुजा दांडेकर, मनीष करगुटकर, सुहास पवार, गजानन करमळकर, निलेश पालकर, दशरथ चाळके, अनिल होळकर, स्वप्निल करगुटकर, आशासेविका श्रीम. सुप्रिया पाटिल, आरोग्य पर्यवेक्षक श्री. जाधव, प्रा. आ. केन्द्राचे सर्व कर्मचारी, रेडक्रॉसचे डॉ. करंदिकर, जयवल्लभ गंधेरे, नाझिया खलीफे, तेजल गुरव आदींसह आंबोळगड येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वास करगुटकर, शामकांत करगुटकर,पद्मनाभ माजरेकर, जब्बार काझी, विश्वनाथ कांबली, निवास शिरगावकर, देवीदास आडीवरेकर, समीर जोशी, मंदार परांजपे, प्रितेष राजापकर, सागर जोशी, श्रीपाद करगुटकर, शेखर थळेश्री, दया करगुटकर, आदिंनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन लाड यांनी केले, तर आभार गिरीश करगुटकर यांनी मानले.