(मास्को)
रशियाच्या चंद्रयान मोहीमेवर निघालेले लूना-२५ हे यान चंद्राच्या कक्षेत नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. यामुळे रशियाच्या चंद्रमोहीमेचे सल्लागार असलेले ज्येष्ठ संशोधक मिखैल मारोव यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. लुना – २५ कोसळल्यावर झाल्यानंतर ९० वर्षीय मिखाईल मारोव यांची प्रकृती अचानक बिघडली.
लुना २५चे लँडिंग अपयशी होणे हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. त्यामुळे माझ्या आरोग्यावर परिणाम झाला. लुना २५ ही मोहिम त्यांच्यासाठी महत्त्वाची होती. चंद्रावर आम्ही उपकरण उतरवू शकलो नाही. ही खेदजनक बाब आहे. हे यान का कोसळले, याबाबत चर्चा केली होईल, अभ्यास केला जाईल. मी सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. माझ्यासाठी हा आयुष्यातील सर्वात कठीण काळ आहे, असे मिखाईल यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले. लूना-25 क्रॅश झाल्याची बातमी एवढी धक्कादायक होती, की मिखाईल यांना कार्यालयातून थेट रुग्णालयात न्यावं लागलं. तेथे शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
२० ऑगस्टला रात्री लुना-२५ हे यान कक्षा कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जाणार होते. यासाठी यानावरील इंजिन सुरू करत दिशा बदल करण्यात येणार होता. मात्र, इंजिनाचे प्रज्ज्वलन झाले नाही. यामुळे लुना-२५ हे यान चंद्रावर कोसळल्याची माहिती रशियन अंतराळ संस्थेने दिली होती. रशियाचं लुना-25 अंतराळयान 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार होतं. रशियाने तब्बल 47 वर्षानंतर चंद्रमोहिम हाती घेतली होती. मात्र, ही चंद्रमोहिम अयशस्वी ठरली आहे.
जवळपास पन्नास वर्षानंतर रशिया चंद्रावरील संशोधन करत आहे. रशियाने 10 ऑगस्ट रोजी 1976 मध्ये लुना-24 पाठवले होते. त्या मोहिमेनंतर जवळपास पाच दशकांनंतर प्रथमच लुना-25 अंतराळात पाठवण्यात आलं. त्याने चंद्राकडे जाण्याचा अधिक थेट मार्ग स्वीकारला होता. 11 दिवसांत म्हणजे 21 ऑगस्टला ‘लुना-25’चंद्रावर उतरणार होतं. हे यान अधिक शक्तीशाली आणि खर्चिक रॉकेटद्वारे चंद्राच्या दिशेने निघाले होते. यानाच्या हलक्या वजनाच्या डिझाईन आणि इंधन साठवणुकीच्या क्षमतेमुळे कमी वेळेत हे यान चंद्राच्या कक्षात पोहचलं होतं. मात्र, चंद्र मोहिम पूर्ण होण्याच्या आधीच हे अंतराळयान क्रॅश झालं होते.