(संगमेश्वर)
पाटगाव- देवरुख येथे माळरानात झाडाखाली अवैध हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयिताकडून १ हजार १० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सुनील संभाजी लांजेकर (वय ५२, पाटगाव, संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. सदर घटना रविवारी (ता. २०) सायंकाळी सहाच्या सुमारास पाटगाव सीमेचा पया येथील माळरानातील झाडाखाली निदर्शनास आली. संशयित विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री करत असताना आढळला. त्यांच्याकडून १ हजार १० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल माया गायकवाड यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास देवरुख पोलिस अमंलदार करत आहेत