(बंगळुरू)
चांद्रयान-३ चे विक्रम लँडर आता ११३ ७ १५७ किमीच्या कक्षेत आले आहे. म्हणजेच आता चंद्रापासून त्याचे सर्वात कमी अंतर ११३ किमी आहे आणि सर्वोच्च अंतर १५७ किमी आहे. इस्रोने डीबूस्टिंगद्वारे चांद्रयानची कक्षा कमी केली आहे. डीबूस्टिंग म्हणजे स्पेसक्राफ्टचा वेग कमी करणे.
इस्रो आता २० ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजता दुसरे डीबूस्टिंग ऑपरेशन करेल. यानंतर चंद्रापासून लँडरचे किमान अंतर ३० किमी आणि कमाल अंतर १०० किमी असेल. २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:४७ वाजता सर्वात कमी अंतरावरून सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला जाईल.
Chandrayaan-3 Mission:
🌖 as captured by the
Lander Position Detection Camera (LPDC)
on August 15, 2023#Chandrayaan_3#Ch3 pic.twitter.com/nGgayU1QUS— ISRO (@isro) August 18, 2023
आता चंद्रावर रात्र आहे, जी २२ ऑगस्टपर्यंत राहील. यापूर्वी १७ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडर-रोव्हरपासून वेगळे करण्यात आले होते. विभक्त झाल्यानंतर, विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलला म्हणाला. थँक्स फॉर द राइड मेट. प्रोपल्शन मॉड्यूल आता पृथ्वीवरून येणा-या रेडिएशनचा अभ्यास करण्यासाठी चंद्राभोवती अनेक महिने फिरेल, तर लँडर-रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर १४ दिवस घालवेल, पाण्याचा शोध आणि इतर प्रयोग करेल.
कक्षा बदलण्याच्या प्रक्रियेनंतर, लँडर पुढील ५ दिवस या कक्षेत राहील. इस्रोच्या ताज्या गणनेनुसार, लँडर २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:४७ वाजता ३० किमी उंचीवरून चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करू शकेल. चांद्रयान-१ चे प्रोजेक्ट डायरेक्टर एम. अन्नादुराई यांच्या म्हणण्यानुसार आता खरा सामना सुरू झाला आहे. हे शेवटचे षटक आहे.
लँडरला ३० किमी उंचीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असेल. प्रदक्षिणा करताना चंद्राच्या दिशेने ९० अंशाच्या कोनात जावे लागेल. लँंिडग प्रक्रियेच्या सुरुवातीला, चांद्रयान-३ चा वेग सुमारे १.६८ किमी प्रति सेकंद असेल. थ्रस्टर्सच्या मदतीने ते खाली केल्यावर ते सुरक्षितपणे पृष्ठभागावर उतरवले जाईल.
चांद्रयान पहिल्यांदा चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. तेव्हा त्याची कक्षा १६४ किमी ७ १८,०७४ किमी होती. कक्षेत प्रवेश करताना त्याच्या ऑनबोर्ड कॅमे-यांनी चंद्राची छायाचित्रेही टिपली. इस्रोने त्याचा व्हीडीओ बनवून आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे. या चित्रांमध्ये चंद्राचे खड्डे स्पष्टपणे दिसत आहेत.