(देवळे / प्रकाश चाळके)
देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंञ्यदिन साजरा होत असतानाच देवरुखमधील मिठाईचे व्यापारी आपलाही वाढदिवस दणक्यात साजरा करत असतात. स्वातंञ्याला जेव्हढी वर्ष पूर्ण झाली तेव्हढेच त्यांचे वय आहे. म्हणजेच बाळशेठ रेडीज यांचा जन्मच १५ आॅगस्ट १९४७ ला झाला आहे.
शंकर पांडुरंग रेडीज हे त्यांचे पूर्ण नाव. सर्वच त्यांना बाळशेठ याच नावाने संबोधतात. बाळशेठ यांचा जन्म स्वातंञ्यदिनी पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथे झाला. ते देवरुखला आजोळी कधी आले आणि देवरुखचे कधी झाले याची त्यांनाच आठवण नाही. नाव शंकर असुन ते शंकराचीच उपासना करत आले आहेत. देवरुख वरची आळी पार व दुबळेश्वर मंदिर हि त्यांची श्रद्घास्थाने आहेत. मिठाईचा व्यापार करुन जिल्ह्यातील सर्वच देवस्थानच्या याञा त्यांनी अनुभवल्या आहेत.
सचोटीने व्यापार करुन आपल्या मुलांना त्यांनी शिक्षण दिले.१५ आॅगस्टचा जन्म म्हणून की काय ते कायम पांढरे कपडे परिधान करत असतात. देवरुखमधील कुणीही त्यांना रंगीत कपडे परिधान केलेले पाहिले नसेल. अशा व्यक्तीमत्वाचा देवरुखवासियांनी वाढदिवस साजरा करुन त्यांच्या कार्याला सलाम केला.