( संगमेश्वर /प्रतिनिधी )
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ अँग्रीकल्चर, खरवते दहिवली महाविद्यालयातील विद्यार्थिनी त्यांच्या अभ्यासक्रमानिमित्त तुरळ येथे आल्या आहेत. यावेळी सरपंच गावचे सरपंच सहदेव सुवरे, उपसरपंच अनंत पाचकल ग्रामविकास अधिकारी विनायक राजेशिर्के, शिक्षण विस्तार अधिकारी विनोद पाध्ये आदिंनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
‘ग्रामीण कृषी कार्यनुभव मिळवण्यासाठी कु. रोशनी तळप, कु. हर्षदा दाभाडे, कु. संस्कृती भोईर, कु. अंजिया बेनूगोपाल, कु. वीना सी.पी आणि कु. मैधिली. ओ, एस. या विद्यार्थीनी संगमेश्वर तालुक्यात आलेल्या आहेत. सध्या या विद्यार्थीनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत अंतिम वर्षात शिकत आहेत. RAWE (Rural Agriculture Work Experience) म्हणजेच ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमानिमित्त संगमेश्वर तालुक्यातील ‘तुरळ ‘गावाला भेट देण्यासाठी आल्या आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य प्र. सुनितकुमार पाटील सर, कार्यक्रम मार्गदर्शक डॉ. एन के पाकळे सर, प्रा. पी. बी. पाटील सर आणि सर्व विषय शिक्षकवृंदांच्या मार्गदर्शनाखाली गावातील पीक लागवड शेती पद्धती, आधुनिक शेतीची माहिती, बळीराजाला वित्तीय पुरवठा करणाऱ्या सहकारी वित्त संस्थांची कार्यक्रम पद्धती, पीक प्रात्यक्षिके, इतर शेतीबाबत माहिती संकलित करणार असून, शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल शेतकरी बांधवांना मार्गदर्शन देखील करणार आहेत.