प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी उत्सव साजरा केला जाणार आहे. संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंच कमिटीच्यावतीने या अंगारकी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात नियोजन बैठक बुधवारी गणपतीपुळे देवस्थानच्या सभागृहात रत्नागिरीचे प्रांताधिकारी डॉ.विकास सूर्यवंशी व तहसिलदार शशिकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला बैठकीला प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे समवेत संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंच कमिटीचे मुख्य पंच तथा सचिव विनायक राऊत व अन्य पंच तसेच जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर, अभिजीत घनवटकर, उमेश घनवटकर, मालगुंडचे मंडळ अधिकारी सुरेंद्र कांबळे, तलाठी रोहित पाठक, गणपतीपुळे पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस नाईक राहूल जाधव आदींसह गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार यांचेसह आरोग्य विभाग, अन्न व भेसळ विभाग पोलीस, महावितरण, बांधकाम विभाग व अन्य संबंधित खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व गणपतीपुळे देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व कोरोना टाळेबंदीमुळे मागील मार्च व जुलै महिन्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थी उत्सव रद्द करण्यात आला होता. त्यानंतर या वर्षाच्या अखेरीस हा अंगारकी संकष्टी उत्सव उत्सव गणपतीपुळे येथे होत आहे. या निमित्ताने अंगारकी यात्रा उत्सव पार पडला जातो मात्र भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. यावेळी परजिल्ह्यातून व घाटमाथ्यावरून येणाऱ्या सर्व दुकानदारांना यात्रेसाठी बंदी घालण्यात आली असून केवळ स्थानिक व्यावसायिक सध्या जे कार्यरत आहेत, त्यांनाच अंगारकी संकष्टी उत्सवाच्या दरम्यान परवानगी देण्यात आलेली आहे. अन्य कुठल्याही दुकानदारांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने घाटमाथ्यावरून कोल्हापूर, सांगली, सातारा मिरज, इस्लामपूर, कवठेमहाकाळ, कराड, इचलकरंजी या ठिकाणाहून हजारो भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येणार आहेत. गेल्या दोन अंगारकीच्या निमित्ताने या ठिकाणाच्या भाविकांना दर्शनाची संधी हुकल्याने यंदा भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसेल असा अंदाज वर्तविला जात आहे ह्या अंगारकीच्या निमित्ताने घाटमाथ्यावरून महाप्रसादासाठी येणाऱ्या गणेश मंडळांना देखील बंदी घालण्यात येणार आहे. यावेळी कुठलाही महाप्रसाद वगैरे देण्यात येणार नाही. तर केवळ “श्रीं” च्या दर्शनाचा लाभ भाविकांना देण्यात येणार आहे. या अंगारकी च्या दिवशी गणपती मंदिर पहाटे साडेतीन वाजता उघडणार असून प्रथमतः मंदिराचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने पूजा अर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे. या दर्शनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे देवस्थान समितीने मंदिर परिसरात दर्शन रांगांची व्यवस्था केली आहे. यावेळी येणाऱ्या भाविकांना दर्शन घेताना त्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे व अवकाळी पावसाचा अंदाज लक्षात घेता दर्शन रांगांच्या ठिकाणी मंडप व्यवस्था केली जाणार आहे. तसेच तसेच दर्शन रांगांच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण मंदिर परिसरात व गणपतीपुळे परिसरात विद्युत पुरवठा करण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर महावितरण विभागाने देखील दक्ष राहून विद्युत पुरवठा सुरू ठेवावा असे आदेश व सूचना महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना ही देण्यात आल्या आहेत. गणपतीपुळे येथे भाविकांची गर्दी लक्षात घेता येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची कुठली कुठलीही कोंडी होऊ नये याकरिता वाहतूक व्यवस्था करण्यासाठी गणपतीपुळे येथील सागर दर्शन व आठवडा बाजार या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एसटी संप मिटून एसटी गाड्यांनी भाविक आल्यास एसटी गाड्यांचे पार्किंग मालगुंड येथील खारभूमी मैदानावर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. याशिवाय विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी दर्शनासाठी विविध ठिकाणाहून येणाऱ्या भाविकां मधून कोरोना लक्षणे दिसल्यास त्यांची ताबडतोब Rt-pcr चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे देवस्थान समितीकडून येणाऱ्या भाविकांना कोरोनाच्या शासन निर्देशानुसार असलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येणार असून तशा प्रकारे अतिशय नेटके नियोजन करून भाविकांना गणेश मंदिरात दर्शन देण्यात येणार आहे. यावेळी दुपारच्या सत्रात अर्धा तास मंदिर बंद करून संपूर्ण मंदिर परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.त्यानंतर रात्री चंद्रोदय झाल्यानंतर ठिक साडेदहा वाजता मंदिर बंद करण्यात येणार आहे.या दिवशी अंगारकी च्या निमित्ताने सायंकाळी साडेचार वाजता श्रींची भव्य पालखी मिरवणूक मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे वाजत गाजत व ढोल-ताशांच्या गजरात गणपती मंदिराचे मुख्य पुजारी, गणपतीपुळे देवस्थान समितीचे चे पंच, देवस्थानचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यावेळी पर जिल्ह्यातील भाविकांना पालखी मिरवणूकीत सहभागी होता येणार नाही असे आवाहन गणपतीपुळे देवस्थान समितीने केले आहे. एकूणच अंगारकी संकष्टी चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर कुठलीही दुर्घटना घडू नये तसेच संपूर्ण मंदिर व गणपतीपुळे परिसरात दिसणाऱ्या संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष केंद्रित करण्यासाठी कार्यरत राहणाऱ्या जयगड पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी व अन्य ठिकाणांहून पोलीस बंदोबस्तासाठी येणाऱ्या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गणपतीपुळे देवस्थान समिती व गणपतीपुळे ग्रामपंचायतीने केले आहे.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !