(चेन्नई)
देशाच्या ७७व्या स्वातंत्र्यदिनी तामिळनाडूच्या रामेश्वरमजवळ भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी पाण्याखाली राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. स्वातंत्र्याची ७७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारत अमृत काळ साजरा करत आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर १०व्यांदा तिरंगा फडकावला आणि भाषण केले. तर दुसरीकडे, ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात पाण्याखाली राष्ट्रीय ध्वज फडकवला. भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
#WATCH | Underwater hoisting of national flag by Indian Coast Guard personnel near Rameshwaram, Tamil Nadu on Independence Day
(Video source: Indian Coast Guard) pic.twitter.com/SPGsU3HxDj
— ANI (@ANI) August 15, 2023
भारतीय तटरक्षक दलाने ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय ध्वजाचे समुद्राखाली प्रदर्शन केले आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, या व्हिडिओमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी खोल पाण्यात राष्ट्रध्वज फडकवताना दिसत होते.