(पाचल /तुषार पाचलकर)
शासनाच्या मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत पाचल व समता प्रबोधन मंच संघटना- राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने उदया 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सायंकाळी ठीक सात वाजता देशभक्तीपर आधारित “ए मेरे वतन के लोगो” या गीत गायन संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाचल पंचक्रोशीतील विविध शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ज्यामध्ये पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लहान गट व आठवी बारावीच्या विद्यार्थ्यांचा मोठा अशा दोन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी आजादी का अमृत महोत्सव व मेरी मिट्टी मेरा देश हे विषय देण्यात आले आहेत. दोन गटात होणाऱ्या या स्पर्धेतील नंबर काढण्यात येणार असून प्रत्येक शाळेतील विशेष चित्र काढलेल्या विद्यार्थ्यांला देखील 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता पाचल ग्राम सचिवालय येथील स्वा.से.कै.आबा नारकर या सभागृहात होणाऱ्या संगीतमय कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच भारत माता महिला प्रभाग संघ पाचल प्रभाग या प्रभागातील बचत गटांतर्गत सर्व महिलांसाठी निबंध स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धेला “माझा भारत देश” व “अमृत महोत्सवी वर्ष” हा विषय देण्यात आला असून सदरच्या दोन्ही स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली चित्र व निबंध 14 ऑगस्ट रोजी पर्यंत ग्रामपंचायत कार्यालय पाचल येथे जमा करावेत असं आव्हान करण्यात आलं आहे.सदर दोन्ही स्पर्धेचे परीक्षण म्हणून हेमंत लब्दे, राजू कुलकर्णी व रवी लाड हे परीक्षक म्हणून कामं करणार आहेत.
75 व्या स्वातंत्राचा अमृत मोहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाअंतर्गत शासनाच्या “मेरी मिट्टी मेरा देश” या अभियान अंतर्गत ग्रामपंचायत पाचल नी गेले काही दिवस अनेक यशस्वी उपक्रम राबविले आहेत. गीतगायनाचा कार्यक्रम हा मेरी मिट्टी मेरा देश या उमक्रमातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण ग्रामपंचायत टीम आणि समता प्रबोधन मंच राजापूर या संघटनेच्या कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत.