(रायगड)
महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव जाऊ नये या उद्देशाने खड्डे भरण्यासाठी तसेच शासनाला व निद्रस्त असलेल्या प्रशासनाल जागे करण्यासाठी रविवारी मुंबई गोवा महामार्गावर ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान, सोबती संस्था व पेण पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गावर रविवारी (ता.१३) रोजी वाशी नाका येथे ‘भीक मागो’ आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा देत सहभाग नोंदविला.
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांकडून भीक मागून सामाजिक कार्यकर्ते व प्रवासी वर्गाने शासानाबद्दल असणारा रोष गांधीगीरी करीत व्यक्त केला. भीक दो भीक दो महामार्गासाठी भीक दो अशी घोषणा देत आणि रस्त्यासाठी एक दोन रुपये तरी द्या अशी विनंती करत मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी तसेच महामार्ग पुर्ण करण्यासाठी भिकेचे दान मागण्यात आले.
या आंदोलनात सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, सह्याद्री प्रतिष्ठानचे शेकडो मावळे, सोबती संस्थेचे बापू साहेब नेने, ॲड. मंगेश नेने, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, पेण पत्रकार, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णुभाई पाटील, उपतालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, तालुकाप्रमुख जगदिश ठाकुर, तालुका समन्वयक दिलिप पाटील, शिवदूत रविंद्रनाथ पाटील, जिवन पाटील, प्रवीण पाटील, कांचन थळे, चेतन मोकल, राकेश मोकल, राहुल पाटील, वसंत म्हात्रे, विनोद म्हात्रे, प्रदीप वर्तक, सोबती संस्थेचे सदस्य आणि विविध सामजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. भीक मागून जमा झालेलु रक्कम नॅशनल हायवे कार्यालयांत जमा करण्यात येणार असल्याचे समीर म्हात्रे यांनी जाहीर केले.