(खेड)
तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांना काही स्कीमच्या माध्यमातून महागडी हातशिलाई मशीन तर काही महिलांना मोडकळीस आलेले घर स्कीममधून दुरुस्त करून देण्याचे आमिष दाखवत २३ लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयितास खेड पोलिसांनी अटक केली आहे. संदीप शंकर डोंगरे (रा. वाराणी, कासार, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संदीप शंकर डोंगरे हा महाराष्ट्र क्रांती सेनेचा युवा अध्यक्ष असल्याचे सांगत होता. तर त्याचा साथीदार बबन मारुती मोहिते हा फरार आहे. फसवणुकीबाबत महिला बचत गटातील ८१९ महिलांनी येथील पोलिस स्थानकात तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर बचत गटातील महिलांनीही २ लाख २५ हजा रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाला गती देत संदीप डोंगरे याला अखेर अटक केली आहे. या प्रकरणातील फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.