(खेड / भरत निकम)
खेड तालुक्यातील तिसंगी येथील बीएसएनएलचा टाॅवर हा दिवसातून अनेकदा बंद ठेवला जात आहे. या गोष्टींकडे बिएसएनएलच्या अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत असून ग्राहकांना याचा मोठा फटका बसत आहे. अनेक ग्राहकांनी या अधूनमधून बंद असलेल्या सेवेसाठी अनेक ग्राहक कंटाळून गेले आहेत. बंद सेवेमुळे अनेक ग्राहकांना महत्वाची माहिती मिळत नाही.
या भागात अनेक ग्राहक माजी सैनिक, निवृत्त पोलीस अधिकारी, सैवानिवृत्त कर्मचारी यांचे वास्तव्य आहे. त्यांनी बिएसएनएलची सेवा घेतलेली आहे. परंतु बराच वेळ दिवसातून तिसंगी येथील मोबाईल टॉवर बंद असल्याने ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत बिएसएनएलच्या वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून अविरतपणे सेवा ग्राहकांना मिळवून द्यावी, अशी मागणी येथील ग्राहकांकडून करण्यात येत आहे.