(नवी दिल्ली)
आगामी क्रिकेट विश्वचषकात भारत आणि पाक यांच्यातील बहुप्रतिक्षित सामन्याची तारीख बदलली असून इतर आठ सामन्यांचे वेळापत्रकही बदलले आहे. सुरुवातीला, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबाद येथे १५ ऑक्टोबर रोजी होणार होता, परंतु तो एक दिवस आधी १४ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. सामन्याच्या स्थळामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नवीन वेळापत्रकानुसार, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्या दिल्लीतील सामन्याची तारीख १४ ऑक्टोबर ऐवजी १५ ऑक्टोबर करण्यात आली आहे. हैदराबाद येथे होणारा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना १२ ऑक्टोबरऐवजी १० ऑक्टोबरला होणार आहे. यासोबतच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना १२ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे.
अहमदाबादमध्ये 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यावर सुरक्षा यंत्रणांनी चिंता व्यक्त केली होती. ही तारीख नवरात्रीचा पहिला दिवस असेल, असे एजन्सींनी सांगितले होते. अशा परिस्थितीत पुरेशी सुरक्षा पुरवण्यात अडचण येऊ शकते. यानंतर आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान बोर्डाशी संपर्क साधला आणि 2 गट सामन्यांची तारीख बदलण्याबाबत बोलले.
Nine fixtures have been rescheduled for #CWC23.
Details 👇
— ICC (@ICC) August 9, 2023
तसेच न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात १४ ऑक्टोबरला चेन्नईत होणारा सामना आता १३ ऑक्टोबरला होणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी होणार्या दोन सामन्यांचे वेळापत्रक बदलले असून ते सामने ११ नोव्हेंबरला होणार आहेत. हे सामने पुण्यात ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात सकाळी १०.३० वाजल्यापासून तर कोलकात्यात इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात दुपारी २ वाजल्यापासून सुरु होतील. विश्वचषक ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून पहिला आणि अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. क्रिकेट नियामक मंडळाने तिकिट विक्रीचे वेळापत्रकही जारी केले आहे, जे २५ ऑगस्टपासून सुरू होईल.
वेळापत्रकात बदल झालेले सामने
इंग्लंड – बांगलादेश, 10 ऑक्टोबर
पाकिस्तान – श्रीलंका 10 ऑक्टोबर
ऑस्ट्रेलिाय – दक्षिण आफ्रिका 12 ऑक्टोबर
न्यूझीलंड – बांगलादेश 13 ऑक्टोबर
भारत – पाकिस्तान 14 ऑक्टोबर
इंग्लंड – अफगाणिस्तान 15 ऑक्टोबर
ऑस्ट्रेलिया – बांगलादेश, 11 नोव्हेंबर
इंग्लंड – पाकिस्तान 11 नोव्हेंबर
भारत – नेदरलँड 12 नोव्हेंबर