( खानू )
कृषी महाविद्यालय, दापोलीच्या “ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम” रावे अंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या ‘कृषी पुत्र’ व ‘कृषी रत्न’ गटाने रत्नागिरी तालुक्यातील खानू गावात आज ‘ऑगस्ट क्रांती दिन’ व ‘जागतिक आदिवासी दिन’ या दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांचे आयोजन सरस्वती विद्यामंदिर,खानू यांच्या विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमांमध्ये ‘रानभाजी प्रदर्शन’ व ‘पाककला स्पर्धा’ यांचा समावेश होता. त्यांनी राबवलेल्या प्रदर्शनामध्ये विविध रानभाज्यांचे छायाचित्र व त्यांची माहिती प्रदर्शित केली गेलेली होती. पाककला स्पर्धेसाठी गावातील बचत गटाच्या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये सहभागी महिलांची संख्या ३५ इतकी होती. सहभागी महिलांनी विविध रानभाज्यांचे पदार्थ आपल्या घरून बनवून शाळेत प्रदर्शित केले होते.
सदर कार्यक्रमाची शोभा पालीतील प्रसिद्ध उद्योजक श्री.रविंद्रजी (अण्णा) सामंत (उद्योग मंत्री उदय सामंत यांचे वडील) यांनी वाढवली. तसेच पाककला स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षिसांचे आयोजन मंगलमूर्ती फाउंडेशनचे संस्थापक श्री.जयप्रकाश पाखरे यांच्या सौजन्याने करण्यात आले होते. गावातील सरपंच व इतर मान्यवर देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. विठ्ठल नाईक, केंद्रप्रमुख डॉ.आनंद हणमंते, कार्यक्रमाधिकारी डॉ.सुदेश चव्हाण व कृषी विज्ञान केंद्र(KVK), लांजा आणि डॉ. संदिप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.