(मुंबई)
प्रसिद्ध गायिका आशा भोसले या अनेकदा काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. आशा भोसले यांचा चिरतरुण आवाज आणि तेवढाच सळसळता उत्साह याने रसिक प्रेक्षकांना अनेक वर्ष भारावून टाकले आहे. आशा भोसले यांचा फार मोठा चाहता वर्ग आहे.
मला फक्त भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास माहिती आहे. माझ्याकडे या इंडस्ट्रीच्या इतक्या आठवणी आणि किस्से आहेत की सहज सांगायचे म्हटले तरी त्यासाठी 3-4 दिवस सहज लागतील. सर्व गोष्टी माझ्या लक्षात आहेत. मी काहीही विसरले नाही. या लाईनमधील (चित्रपटसृष्टी) मी शेवटची मुघल आहे, असे उद्गार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी काढले आहेत.
#WATCH | Mumbai: Singer Asha Bhosle says, "Only I know the history of the film industry…There are so many stories that it will take me 3-4 days if I start talking about it…I have not forgotten anything. I am the last Mughal of this film line." pic.twitter.com/8Fe2GYFRGT
— ANI (@ANI) August 8, 2023
आशा भोसले या सध्या वयाच्या ८९ व्या वर्षात आहेत. मात्र, हा त्यांच्यासाठी फक्त एक आकडा आहे. त्यांचा उत्साह किंचीतही कमी झालेला नाही. त्यांनी नेहमीत सर्वांना मार्गदर्शन केलं आहे. लहान कलाकारांचीही त्या आस्थेने विचारपूस करुन त्यांना समजावून सांगतात. वेगवेगळ्या रियॅलिटी शोमधून देखील आशाजी या सर्वांना मार्गदर्शन करत असतात. आता त्यांचं एक विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
आशा भोसले यांच्या त्यांच्या या विधानमधून नेमकं काय म्हणायचं असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. मी बॉलिवूडमधील एकमेव अशी व्यक्ती आहे की जिला बॉलिवूडचा सर्व इतिहास माहिती आहे. मी जर त्याविषयी सांगायला लागले तर तीन ते चार दिवस अपुर्ण पडतील. मी काहीही विसरलेली नाही. या इंडस्ट्रीमधील मी शेवटची मुघल आहे. असं विधान आशा भोसले यांनी केलं आहे. यामुळे त्यांना नेमकं यातून सांगायचं काय होतं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
आशा भोसले यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हिडिओखाली काही लोकांनी आशा भोसले यांच्या या अफाट कारकिर्दीला सलाम केला आहे तर काही लोकांनी आशा भोसले यांच्या या वक्तव्यावर टीकादेखील केली आहे. बरोबर एका महिन्याने म्हणजेच ८ सप्टेंबर २०२३ रोजी आशा भोसले ह्या ९० वा वाढदिवस साजरा करणार आहेत.