(खेड / भरत निकम)
पूर्वीच्या खेड विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राहीलेल्या माजी आमदार कै. तु्.बा.कदम यांच्या सुपुत्राने सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतल्याने खेडच्या राजकारण काहीशी खळबळ उडवून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
खेडचे सभापती आणि त्यानंतर पूर्वीच्या १० खेड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार अशी राजकीय स्थिती माजी आमदार स्वर्गीय तु.बा.कदम यांची होती. त्यांना आवडीने सगळे दादा म्हणत असत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे ते दादा बनले होते. बक्कळ पैसा आलिशान बंगला गाडी असे त्यांच्याकडे काही नव्हते. संयमी व शांत स्वभावाचे दादा गरीबीतून राजकारण पाठबळावर करत होते. पूर्वी आमदार म्हणजे शिक्षण सम्राट असा ट्रेंड त्याकाळी होता. तोच ट्रेड दादांनी खेडला आणला. भरणे येथे कुणबी शिक्षण संस्थेच्या नवभारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, तु.बा.कदम महाविद्यालय, डिएड व बिएड काॅलेज, अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्र, नवभारत इंग्रजी माध्यम शाळा अशा विस्तीर्ण कारभारात ते गुंतले.
१९९० च्या दशकात सत्तेसाठी वारेमाप खर्च करण्यात आला. कुणबी समाजात जन्मलेल्या दादांनी गरीबीतून उच्च शिक्षण घेतले होते. त्या काळात पैशाशिवाय राजकारण चालत होते. समाजाची साथ व सहकारी यांच्या पाठबळावर एकतर्फी विजय ते खेचून आणत होते. दापोली तालुक्यातील ३२ गावापासून ते खेडच्या ग्रामीण भागात पैसा आणि प्रसिद्धी हे नव्हत. पण दिलेला शब्द पाळण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारे सच्चे सहकारी होते. काळांतराने राजकारणात बदलाव आला होता. १९९२ च्या निवडणुकीत अपक्ष केशवराव भोसले व शिवसेनेचे रामदास कदम यांच्या विरोधात त्यांचा पराभव झाला होता. निवडणुकीच्या आखाड्यात सक्रिय सहभाग घेणारे दादा शिक्षणक्षेत्राकडे वळले. शिक्षण संस्थेच्या इमारतीत वास्तव करुन ते तिथेच स्थिरावले. दादांचा शेवटही या संस्थेच्या इमारतीत झाला होता. त्यांच्या पश्चात मुली आणि एक मुलगा अमित हा आहे.
अमित वडीलांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. खेडच्या अनेक सामाजिक संघटनेत कार्यरत असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते सहभागी आहेत. राष्ट्रवादीच्या फुटी नंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेत शरद पवार यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने आपण शरद पवार गटात सक्रिय होण्याचे संकेत दिले. शरद पवार यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी थेट सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेण्याची सुचना केली होती. त्याप्रमाणे शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, रोहित पवार यांची भेट घेतली. तसेच एकेकाळी सहकारी असणारे तु.बा.कदम यांच्या कुटुंबीयांची आपुलकीने चौकशी केली. तसेच अमित कदम यांच्या पक्षातील कामाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. अमित याच्या सक्रिय राजकारणातील सहभागाने खेडच्या राजकारणात काहीशी खळबळ उडाली असून नवी दिशा, नवा अध्याय, अशी सुरुवात पुढे वाटचाल करत आहे, असे लोकांना वाटतं आहे.