(खेड / भरत निकम)
तालुक्यातील हेदली गावच्या विकासासाठी रामदास कदम यांनी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे गावच्या विकासाला प्राधान्य देत ग्रामस्थ माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या समवेत आहेत, अशी माहिती खेड पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम चिनकटे यांनी दिली.
अनेक विकासकामे रामदास कदम यांनी निधी मंजूर करुन दिली. रस्त्यांची कामे आजही सुरुच आहेत. या रस्ते कामाला आमदार योगेश कदम यांनी मान्यता दिली आहे. दुसरे कुणी नाही. त्यामुळे संपूर्ण गावातील जनता शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी रामचंद्र आईनकर, युवराज गुजर, राजू घाणेकर आदी उपस्थित होते.