(दापोली)
कोकण कृषी विद्यापीठ आयोजित, विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेअंतर्गत चतुर्थ वर्षातील कृषी सखी गटाने सोमवारी कोळथरे गावात भात पेंढयावर युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक घेतले. यावेळी कृषी सखी गटातील सेजल आलिम या विद्यार्थिनीने यूरिया प्रक्रियेची संपूर्ण माहिती सांगितली. तसेच त्याचे फायदे सांगितले. दरम्यान अक्षता चाबुकस्वार, श्री सौम्या, आरती टेंबरे, शुभांगी शिंगाडे, अश्विनी पाटील, संस्कृती पवार व कृतीका कोथे ह्या विद्यार्थिनींने ते प्रात्यक्षिक करून दाखवले. सदर प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कोळथरे गावचे सरपंच मा. राजाराम जाधव आणि गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवली.
या प्रात्यक्षिकासाठी कृषी महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. विठ्ठल नाईक, कार्यक्रमाधिकारी डॉ. झगडे, डॉ. शिगवण, डॉ. वरवडेकर व विषय तज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे यांचे मार्गदर्शन लाभले.