(संगलट-खेड / इक्बाल जमादार )
स्वच्छ भारत मिशन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गाव पातळीवर सामूहिक वर्तनात बदल घडवणेसाठी, नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यावाबत केंद्र शासनाच्या सुचना असल्याबाबत जि.प.कडून कळविण्यात आले आहे. जेणेकरुन वर्तणुकीत परिवर्तन घडवून शाश्वत स्वच्छतेविषयी मोठ्या प्रमाणात जागृकता निर्माण होईल. तसेच केंद्र शासन स्तरावरुन स्वच्छ सर्वेक्षण (ग्रा.) अंतर्गत दि. ०१ ऑगस्ट २०२३ ते दि. १५ ऑगस्ट २०२३ अखेर सर्व गावांची पडताळणी करण्यात येणार आहे.
यास्तव स्वच्छता विषयावर गाव पातळीवर जागृकता निर्माण करण्याकरिता शालेय विद्यार्थी महत्वाचा घटक आहे. विद्यार्थी त्यांच्या पालकांना, कुटूंबांना आणि समाजाला चांगल्या स्वच्छता पध्दतीचा अवलंब करण्यासाठी व त्यांच्यात बदल घडवून आणण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणुन काम करु शकतात. त्या अनुषंगाने विद्याथ्यांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी व महत्व बालवयातच प्रोत्साहित करण्यासाठी विविध मुद्यांवर शालेय स्तरावर दि.०२/०८/२०२३ पासून स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
यापैकीच मुलांनी स्वयंस्फूर्तीने सुट्टीच्या दिवशी केलेले हे सत्कर्म. “दिवस सर्वांच्या सवडीचा,रविवार मुलांच्या आवडीचा;” पण रविवारी सुट्टी असुनही दमामे-तामोड गावातील जि.प. मराठी शाळेतील मुलांनी घरी न बसता वाडी वाडीतील प्लॅस्टिक कचरा गोळा करून पालकांनी प्लॅस्टिक चा वापर टाळावा यासाठी जनजागृती केली. शनिवारी परिपाठात प्लॅस्टिकबद्दल माहिती ऐकली; आणि लगेच रविवारी त्या ज्ञानाचे प्रत्यक्ष उपयोजन केलेले पाहून शिक्षकही भारावून गेले. मुलांच्या या कृतीचे पालकांनीही कौतुक केले. स्वच्छ भारत मिशनची ही खरी सुरुवात असल्याचे यावेळी दिसून आले.