(जैतापूर / वार्ताहर)
जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आणि चैतन्य संस्था प्रेरित त्रिवेणी संघाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत नक्षत्र व प्रेरणा गाव समितीच्या सहकार्याने निर्भया या महिला सक्षमीकरण आणि आर्थिक साक्षरता मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना, महिला भगिनींनी आपला भाऊ समजून संकट काळात कधी हाक मारावी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत असे प्रतिपादन सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी यांनी जैतापूर येथे केले.
जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आणि चैतन्य संस्था प्रेरित त्रिवेणी संघाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत नक्षत्र व प्रेरणा गाव समितीच्या सहकार्याने निर्भया या महिला सक्षमीकरण आणि आर्थिक साक्षरता मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला
महिला, मुली यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी साहेब अधिक संवेदनशील असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पोलीस सदैव तत्पर असून महिला भगिनींना योग्य ते कायदेशीर सहकार्य सदैव केले जाईल. 112 कॉल सारखी फोन सुविधा शासनाच्या माध्यमातून पोलीस विभागाच्या वतीने कार्यान्वित असून संकटसयी या सुविधेचा नक्की वापर करा. पोलीस पंधरा मिनिटाच्या आत आपल्या मदतीसाठी हजर राहतील. आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या सर्वच महिला भगिनींना योग्य तो मान सन्मान ठेवून त्यांना योग्य ती कायदेशीर मदत पोलिसांकडून केली जाईल. संकट काळात पोलिसांना आपले भाऊ-बहीण समजून कधीही हाक मारा आपल्याला नक्की सहकार्य केले जाईल असे सांगत महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने कायदेविषयक माहिती आणि मार्गदर्शन केदारी यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर जैतापूरचे लोकनियुक्त सरपंच राजप्रसाद राऊत, उपसरपंच मीनल मांजरेकर, युनियन बँक ऑफ नाटे शाखेचे व्यवस्थापक पाटील, जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राकेश दांडेकर, सल्लागार गिरीश करगुटकर, त्रिवेणी फेडरेशनच्या पदाधिकारी नैशदा गिरकर ,रेशम लाड ,सिमरन मांजरेकर , जैतापूर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विलास डंबे, श्री देव वेताळ मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोहर पावसकर, पोलीस नाईक स्नेहा करलकर, पोलीस शिपाई श्रुती गिजबिले,पोलीस कॉन्स्टेबल सागर कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रोप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असताना विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे . त्याचाच एक भाग म्हणून आज जैतापूर आणि दळे परिसरातील महिला भगिनींसाठी महिला सक्षमीकरण आणि आर्थिक साक्षरता व बँकेच्या योजना या उपक्रमांतर्गत जि. प .शाळा जैतापूर नंबर 1 येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जवळपास 200 महिलांनी सहभाग घेतला होता.
यावेळी युनियन बँक ऑफ इंडिया नाटेचे व्यवस्थापक पाटील यांनी आर्थिक साक्षरता अंतर्गत पैशाची बचत ,योग्य गुंतवणूक आणि वाढ याबाबत माहिती देताना शासनाच्या वतीने महिलांसाठी सुरू केलेली महिला सन्मान योजनेविषयी आणि अन्य बँकेच्या विविध योजना माहिती दिली .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन लाड यांनी केले तर प्रास्ताविक गिरीश करगुटकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष राकेश दांडेकर, उपाध्यक्ष महेश नारकर, सचिव सुनील करगुटकर, सहसचिव गजानन करमळकर, खजिनदार वासुदेव नारकर, सदस्य श्रीकृष्ण राऊत, भर्तृहरी भाटकर, रेशम लाड, मंगल मयेकर, सिद्धी शिरसेकर, निलेश पालकर, अनुष्का मांजरेकर अखिला मालीम, आशा कार्यकर्त्या पल्लवी पारकर, सुप्रिया पाटील, प्रिया जाधव, नवनिर्वाचित सदस्य बंदिनी मांजरेकर, रिया मांजरेकर, प्रसाद मांजरेकर,स्वप्निल सोगम, सिमरन मांजरेकर, प्रियांका नार्वेकर, समृद्धी मांजरेकर आदींनी मेहनत घेतली.