(चिपळूण)
शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे संचलित आय. एम. एस. सी.सी.आर.या संस्थेचा नुकताच २४ वा वर्धापन दिन. त्यानिमित्त वर्षा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण दूत पुरस्कार प्राप्त श्री धीरज वाटेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
समन्वयक सौ अर्चना बक्षी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्री धीरज वाटेवर सरांनी आपल्या ओघवत्या शैलीत मुलांना अत्यंत बहुमोल मार्गदर्शन केले. सरांनी बोलताना सांगितले की एकच उद्योग आयुष्यभर चालेल असा सध्याचा काळ राहिला नाही. तुम्हाला बहुआयामी होण्याची या काळाची गरज आहे. “तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा पण त्यात अव्वल होण्याचा प्रयत्न करा” असा कानमंत्र त्यांनी उपस्थितांना दिला. कॉमर्सच्या भाषेत सांगताना ते म्हणाले की आपलं आयुष्य हाच मुळी एक व्यवसाय आहे. यात तुम्ही गुंतवणूक केल्याशिवाय तुम्हाला मोबदला मिळणार नाही. तुम्ही उत्तम यशस्वी झाल्यानंतर त्या समाजाची मालमत्ता (Asset) ठरता आणि इतर समाजाप्रती तुमचे दायित्व (Liability) राहते. “तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा पण त्यात अव्वल होण्याचा प्रयत्न करा तरच तुम्ही समाजाची मालमत्ता (Asset) बनू शकाल आणि त्यासाठी अपरिमित कष्ट घ्या”. असा कानमंत्र त्यांनी उपस्थितांना दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शमा आगवेकर यांनी केले व नमिता मोहिते मॅडमनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. निसर्ग चित्र व अनेक औषधी वनस्पती व त्यांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री धीरज वाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अत्यंत उत्साहात आय.एम.एस.सी.सी.आर च्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.