(खेड)
टाक्स पूर्ण केल्यास भरघोस कमिशन मिळेल, असे आमिष दाखवून खेड भरणे येथील जाधववाडी येथील – एकाची सव्वाचार लाखाची ऑनलाइन फसवणूक होण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विशाल महीपत कुंभार यांनी फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.
हा प्रकार 30 जून ते २ ऑगस्ट या दरम्यान घडला. एका अनोळखी व्यक्तीने त्याच्या मोबाइल नंबर ८४७६९०११९६ वरुन फिर्यादी यांचे फोनवर इंग्रजीमध्ये पार्ट टाईम / फुल टाईम जॉबचा मॅसेज पाठविला.
त्यानंतर फिर्यादीच्या मोबाइलवर लिंकद्वारे काही टास्क पाठविले. ते टास्क पूर्ण केल्यास भरघोस कमिशन मिळेल, असे आमिष दाखवून पहिल्यांदा त्या टास्कमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितल्याने. फिर्यादीने त्या अनोळखी व्यक्तीच्या बँकेच्या खात्यावर टप्याटप्याने एकूण ४,१७,१७२ रुपये एवढी रक्कम जमा केली. परंतु, त्यांनी फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारचे कमिशन दिले नाही. तसेच फिर्यादी यांनी पाठवलेली रक्कमही परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खेड पोलिस स्थानकात फिर्याद दिली.