(नवी दिल्ली)
भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर गुकेश डी याने जागतिक क्रमवारीत पाच वेळा वर्ल्ड चेस चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांना मागे टाकले आहे. डी गुकेश याने विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुस-या फेरीत विजय मिळवत मोठी कामगिरी केली. ४ ऑगस्ट रोजी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुस-या फेरीत गुकेशने अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हला पराभूत करून बाजी मारली. सतरा वर्षांच्या गुकेशने दुस-या फेरीच्या सामन्यात अझरबैजानच्या इसकांद्रोवचा ४४ चालींमध्ये पराभव केला.
किशोरवयीन ग्रँडमास्टर डी गुकेशने बुद्धिबळ विश्वचषकाच्या दुस-या फेरीत अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हचा पराभव केला. यासह फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेस(एफआयडीई) च्या थेट जागतिक रेटिंगमध्ये त्याने आपला आदर्श विश्वनाथन आनंद यांचा पराभव केला. त्यामुळे गुकेश आता विश्वनाथन आनंद यांना मागे टाकत जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे तर विश्वनाथन आनंद या क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर आहेत. महत्त्वाचे म्हणजे डी गुकेश हा विश्ननाथन आनंद यांचा शिष्य आहे. विश्ननाथन आनंद यांनी वेस्टब्रिज आनंद चेस अॅकॅडमीमधून गुकेशला प्रशिक्षण दिले आहे.