(गुहागर)
आत्तापर्यंतच्या नुसत्या भुल-थापांना कंटाळून गावाच्या विकासासाठी एक माफी शेकडो ग्रामस्थ महिलांनी पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण व तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांच्यासह युवा जिल्हाप्रमुख केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश संपन्न झाला.
अनेक वर्ष रस्ता खडीकरण व इतर कामांची मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते आहे, याची जाणीव होवुन आपले काम फक्त पालकमंत्री करु शकतात हा विश्वास मनात धरत विभागप्रमुख नरेश पवार यांच्याकरवी तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांच्याकडे एका रस्त्याच्या खडाकरण व डांबरीकरणाची मागणी केली असता तीचा पाठपुरावा करुन तो जनसुविधा योजनेत बसवुन त्यास पालकमंत्री सामंत यांचेकडुन निधीसह मंजुरी मिळविल्याने धोपावे ग्रामस्थ यांना भोडसावणारा प्रश्न सुटला. हा आनंद व्यक्त करत आपला विकास करायचा असल्यास शिवसेनेशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाली व ग्रामस्थांनी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. व त्यानुसार नुकताच पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणुन शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा युवा प्रमुख केदार (मुन्ना) देसाई, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के, शिवसेना गुहागर तालुका प्रमुख दिपक कनगुटकर, शिवसेना तालुका सचिव संतोष आग्रे, तालुका संघटक प्रल्हाद विचारे, महिला तालुका प्रमुख सौ.सुप्रिया चव्हाण, तालुका युवा प्रमुख रोहन भोसले, युवा तालुका सचिव अमरदिप परचुरे, जेष्ट शिवसैनिक आत्माराम मोरे, उपतालुका प्रमुख राजेश धामणस्कर व महेश जामसुतकर, विभागप्रमुख संदिप भोसले, उपविभागप्रमुख नरेश पवार, युवा शहर संघटक राकेश साखरकर, युवा शहर उपप्रमुख अमोल गोयथळे, उपविभागप्रमुख नरेश पवार व उमेश किल्लेकर, शाखाप्रमुख रोहीदास जाधव, दत्ता जांगळी, मनिष मोरे,संदेश कचरेकर, उपशाखा प्रमुख भिकाजी संसारे, शिवदुत प्रफुल जाधव व दिपक शिरगावकर, नवनाथ कुरधुंडकर , महेश शितप सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करुन गावातील अनेक विकासकामांची मागणी करण्यात आली. यामध्ये धोपावे खाडीचा गाळ उपसणे, खाडीला संरक्षक भिंत बांधणे, रानवी ते धोपावे मुख्य रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, धोपावे गावासाठी कायम स्वरुपी पाणी असणारी विहीर बांधणे इत्यादी कामांच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
पक्ष प्रवेशामध्ये प्रमुख कैलास पवार, भिकाजी संसारे, जयराज भोसले, रविंद्र पाटील, रामदास संसारेसह महिला वर्गातुन सौ सुनिता जाधव, भाग्यश्री संसारे, प्रणाली जाधव, रणांगणी पाटील, विनंती संसारे आदींसह शेकडोंच्या संख्येने प्रवेश करण्यात आला या सर्वांना धन्यवाद देवुन पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते सदानंद चव्हाण यांनी मार्गदर्शन करतांना प्रवेशासाठी चांगला पक्ष स्विकारला असल्याचे म्हटले तसेच विकासकामांची हमीही दिली. व त्यासाठी पुर्ण पाठपुरावा करु असेही सांगितले. तर तालुका प्रमुख म्हणाले धोपावेच्या महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरविण्यासाठी नळपाणी योजना राबविण्यास आपले सहकार्य आहे अशी ग्वाही दिली याचबरोबर उपजिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के यांनी मार्गर्शन केेले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाखाप्रमुख रोहिदास जाधव यांनी केले. तर सचिव संतोष आग्रे यांनी आपले मत मांडले आणि सर्वांचे स्वागत करत आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.