( संगलट-खेड / इक्बाल जमादार )
चिपळूण तालुक्यातील नीलिमा चव्हाण हिचा मृत्यू अकस्मित नसून घातपाता चा संशय आहे या संदर्भात सखोल चौकशी करून नीलिमा चव्हाण हिला आपण न्याय द्यावा व आरोपी वर कठोर कारवाई करावी अशी मागणी दापोली शिवसेना माहिला युवती सेनेतर्फे करण्यात आली आहे.
दर घटनेचा निषेध शिवसेना माहिला युवती सेना यांच्यातर्फे करण्यात आला. यावेळी युवती अधिकार कीर्ती परांजपे, शहरप्रमुख रसिका पेटकर, माजी समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर, नगरसेविका कृपा घाग, प्रीती शिर्के, माजी नगराध्यक्ष परवीन शेख, माजी नगरसेविका सुप्रिया रिसबुड, शबनम मुकादम, मा सरपंच दर्शना पवार, सुमय्या काझी, दर्शना माने, सुचिता पालटे, अनघा पवार, राजश्री पवार, मिनाक्षी खेडेकर, सबिया गिलगीले, शबाना रुमाणे व शहरातील महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.