(वैभव पवार / गणपतीपुळे)
गणपतीपुळे येथे गेल्या दोन महिन्यापूर्वी समुद्राच्या मोठ्या लाटांमुळे समुद्र किनाऱ्यावरील स्थानिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने पाहणी करुन व्यावसायिकांना योग्य ती मदत केली जाईल, असा शब्द दिला होता. हा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी पूर्ण करत गणपतीपुळे येथील एकूण ३६ व्यावसायिकांना श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून प्रत्येकी ५ हजार रूपायांचा धनादेश सुपूर्द केला आहे. यासाठी युवा सेना विभाग प्रमुख अमित घनवटकर यांनी विशेष प्रयत्न केले. ही मदत पालकमंत्री यांनी आपल्या सामंत कुटुंबियांच्या माध्यमातून केली आहे.
या मदतीचा धनादेश सुपूर्द करताना प्रसिद्ध जेष्ठ उद्योजक अण्णा सामंत, राजन शेट्ये, तालुका प्रमुख बाबू म्हाप, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, स्मितल पावसकर, रोशन फाळके, प्रकाश साळवी, अभिजित गोडबोले कांचन नागवेकर, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, सौरभ मालूष्टे, अमित घनवटकर, राजू साळवी आदी उपस्थित होते.