(भुवनेश्वर)
ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील न्यायालयाने सोमवारी २५ वर्षांपूर्वी भूसंपादन विरोधी आंदोलनादरम्यान एका पोलिस कर्मचा-याची हत्या केल्याप्रकरणी सीपीआय नेते आणि माजी आमदार एन नारायण रेड्डी यांच्यासह १३ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण त्यातील ८ जणांचा या आधीच मृत्यू झाला. बेरहामपूरच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी १९९८ सालच्या खटल्यावरून ही शिक्षा सुनावली.
बेरहामपूरच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी १९९८ सालच्या एका खटल्याप्रकरणी माजी आमदार नारायण रेड्डी यांच्यासह १३ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. १९९८ मध्ये टाटा कंपनीची जमीन ताब्यात घेताना पोलिस आणि जनता आमने-सामने आले होते. या घटनेत पोलिस निरीक्षक विनोद मेहर यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने नारायण रेड्डी यांच्यासह १३ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींनी सिंधीगाव येथे एका पोलाद प्रकल्पाच्या बांधकामासाठी भूसंपादनाला विरोध करताना पोलिसांच्या पथकावर बाँब फेकल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी विनोद मेहर या राखीव पोलिस निरीक्षकाचा १८ जून १९९८ रोजी मृत्यू झाला होता.
माजी आमदारासह २२ जणांचा या प्रकरणात समाविष्ठ होता. त्यापैकी १३ जण न्यायालयात हजर झाले. इतर आठ जणांचा आधीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी न्यायमूर्ती राज कुमार दास यांनी ६५ साक्षीदारांचे जबाब नोंदवून २५ वर्षे जुन्या खटल्याचा निकाल दिला.