(रत्नागिरी)
दर्यावर्दी प्रतिष्ठानची सन 2022-23 ची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि. 17 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता श्री. वसंत तुकाराम पाटील यांचे निवासस्थानी दर्यावर्दी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंगशेठ दाभोळकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. सभेला सुरुवात होण्यापूर्वी ज्ञान अज्ञात सर्व दिवंगत व्यक्तींना प्रतिष्ठांनच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंतर प्रतिष्ठानचे सचिव दिनेश जाक्कर यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संचालक यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
तदनंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले व सन 2022/2023 सालातील जमाखर्चाच मंजुरी देवून सन 2023/ 2024 सालाकरिता सनदी लेखापालाची नेमणूक करण्यात आली. सन 2023/24 सालाकरिता गुणवंत सत्कार समारंभ, श्री सत्यनारायणाची महापूजा व हळदीकुंकू समारंभ, वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता अभियान व पावसाळी क्रिकेट स्पर्धा अनेक सामाजिक उपक्रम राबविणे यासारखे कार्यक्रम घेण्याचे ठरले. दर्यावर्दी प्रतिष्ठानचे संचालक संतोषजी पावरी यांनी मार्गदर्शन करताना विविध उदाहरणे, दाखले देऊन सभासदांमध्ये सामाजिक कार्याची ज्योत प्रज्वलित केली, त्यांच्यात एक ऊर्जा निर्माण केली. तसेच प्रतिष्ठानच्या आगामी रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त कार्यक्रमासंदर्भात चर्चा केली. प्रतिष्ठानच्या नियोजित बहुउद्देशीय इमारतीसंदर्भात प्लॅन समजून सांगितला व तसे नियोजन करण्यात आले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग दाभोळकर यांनी अध्यक्षीय भाषण करताना सर्व कार्यक्रमाचा आढावा घेऊन आपण हे दैवी काम समजून अविरतपणे सुरू ठेवूया असे आवाहन केले. नंतर सर्वांचे आभार मानून अध्यक्ष्यांच्या परवानगीने सभा संपली असे जाहीर करण्यात आले. सहभोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.
कार्यक्रमाच्या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग शेठ दाभोळकर, सचिव दिनेश जाक्कर, संचालक भगवान पाटील, वसंत पाटील,निलेश पाटील महिला अध्यक्षा सौ. मेघा पाटील, विकास दाभोळकर, ज्ञानेश्वर पाटील, जगदीश पाटील, संजय वासावे, राजकुमार आगडे, सुनील पाटील, प्रशांत होडेकर, हरिश्चंद्र कोलकांड, रामा जाक्कर, उदय पाटील, राजकुमार म्हातनाक, प्रतिम वासावे, प्रज्ञेश जाक्कर, तुषार पालशेतकर, राकेश आगडे, गणेश ढोर्लेकर तसेच महिला सदस्यांमध्ये सौ. वैजयंती पटेकर, सौ. नेहा पाटील, सौ. जलपरी आगडे, जातिषा पाटील, सायली वासावे, कविता पटेकर, सत्यवती भायनाक, विशाखा पाटील, प्रियाली पाटील, साची पाटील, मिलन पाटील, तृष्णा पाटील, निलिमा वासावे आदि उपस्थित होते.