(देवरूख / सुरेश सप्रे)
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा पासून त्याच्या विचाराने प्रेरित होवून जिल्ह्यात राष्ट्रवादीची संघटना मजबुत केली. आता काहींनी बेरजेचे राजकारण करत सर्व पदे भोगून मोठे झालेल्यांनी पवारसाहेबांना अंधारात ठेवून गद्दारी केली आहे. पक्षाशी गद्दारी करत गेलेल्यापाठी काही जण स्वार्थ साधणेसाठी गेलेत. त्या गेलेल्यांचा विचार आपण न करता आपापसात मतभेद व मनभेद बाजूलाठेवत राष्ट्रवादीच्या विचारांनी प्रेरीत होत पुन्हा नव्या जोमाने काम करून पक्षाची संघटनात्मक बांधणी करू या असा निर्धार आज देवरूख येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या( शरद पवार गट) जिल्हा बैठकीत करणेत आला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार देवरूख येथिल मराठा भवन येथे जिल्हातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची जिल्हा विस्तारीत कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. विस्तारीकरण सभेला बबवराव कनावजे (जिल्हा निरिक्षक), शेखर माने (निरिक्षक) जेष्ठ नेते राजाभाऊ लिमये, आजी आम. रमेशभाई कदम माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, महमद रखांगी, नलूताई भुवड, धनश्री मोरे, प्रकाश शिवगण, चित्राताई चव्हाण (महिला जिल्हा अध्यक्ष) साई आरेकर (युवक अध्यक्ष) निलेश भूवड.( विधानसभा क्षेत्र अध्यक्ष.) बशरभाई मूर्तजा, मिलींद किर (माजी नगराध्यक्ष ) बारक्याशेट बने(राज्य चिटणीस) आदींसह जिल्हातील सर्व तालुक्यातील सुमारे १००चेवर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकित जिल्हात संघटन वाढविणे तसेच प्रत्येक तालुका अध्यक्षांसह विविध पदाधिकारी नियुक्ती करणे या विषयी चाचपणी करणेत आली. ही पक्षाची बांधणी करताना तरूणांना जास्ती जास्त संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली असून शरद पवार गटाची ताकद दाखविणेचीसाठी जिल्हा मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सद्यस्थितीत हे चित्र स्पष्ट नसले तरी आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी हे धोकादायक ठरू शकते.