(संगलट -खेड / इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील अति महत्वाचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा खारीपट्टा विभागातील भैरवली पन्हाळजे मार्गावर दोन ठिकाणी रस्त्याला गटारी नसल्याने दोन ठिकाणी दरड खाली आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की भैरोली पन्हाळजे मार्गावर रस्त्यावर गटारे संबंधित बांधकाम खात्याने काढली नसल्याने गायमुख भैरवली नंबर एक या ठिकाणी भर रस्त्यावर दरड कोसळली असून दरडी नाजिक असलेल्या मरियम बी अल्ली चौगुले यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे.
दरड घरावर कोसळली तर नुकसान होण्याचे शक्यता नाकारता येत नाही. सदर बांधकाम खात्याकडून गटाराची कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने अनेक समस्याला समोर जावे लागत आहे. तसेच गेले अनेक वर्षापासून या रस्त्यावरील झाडे देखील तोडली जात नसल्याने लहान-मोठे अपघात होत आहेत.
याबाबत नागरिकांनी अनेक वेळा संबंधित खात्याकडे लक्ष वेधण्याची सूचना केल्या मात्र कोणत्या बाबीकडे लक्ष देताना दिसत नाही एखादा दरड कोसळून घरावर गेली तर नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न भैरोली गावचे सामाजिक कार्यकर्ता अब्दुल्ला भाई चौगुले आणि उपस्थित केला आहे. तरी याबाबत संबंधित खात्याने त्वरित लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.