(बार्बाडोस)
कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजाच्या भेदक गोलंदाजी त्यानंतर इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला सामना जिंकला. या विजयासह भारताने तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजच्या संघ अवघ्या ११४ धावांवर ढेपाळला. प्रत्युत्तरात भारताने ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
अत्यंत कमी धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी भारतालाही खूप कसरत करावी लागली. भारताला विजयासाठी ११५ धावांची गरज होती. मात्र, हे लक्ष्य गाठण्यासाठी भारताने ५ विकेट गमावल्या. भारतीय संघाने कॅरेबियन्सविरोधात हा सलग नववा विजय मिळवला आहे. विंडीज संघाला शेवटचा विजय २०१९ मध्ये चेन्नईच्या मैदानावर मिळाला होता.
वेस्ट इंडिजने पहिल्याच वनडेत भारतीय संघाला चांगलाच घाम फोडला. भारताला विजयासाठी ११५ धावा हव्या होत्या. मात्र, हे आव्हान पूर्ण करण्यासाठी भारताचा अर्धा संघ गारद झाला. पण तरीही भारताला पहिल्या वनडे सामन्यात ५ विकेट राखून विजय साकारता आला. या विजयासह भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इशान किशनने यावेळी ५३ धावांची दमदार खेळी साकारली. पण इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ठराविक अंतराने बाद होत गेल्याने अखेर रोहित शर्माला मैदानात उतरावे लागले. त्याने भारताला विजय मिळवून दिला.
बार्बाडोसच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या ११४ धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियाने २२.५ षटकात ५ विकेट गमावत ११५ धावांचे लक्ष्य पूर्ण केले.
तत्पूर्वी भारताच्या कुलदीप यादवने विंडीजच्या संघाला घायाळ केले. त्याने अवघ्या ६ धावात ४ विकेट घेतल्या. तसेच रविंद्र जडेजाने ३ बळी घेतली. यासोबतच हार्दिक पांड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. विंडीजकडून कर्णधार शे होप शेवटपर्यंत झुंज देत होता. मात्र, कुलदीप यादवने त्याची खेळी ४३ धावांवर संपवली. वेस्ट इंडिजकडून होपनंतर सर्वाधिक धावा अलिक अथनाजेने केल्या. त्याने २२ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज फारशी कमाल करू शकले नाहीत.