(नवी दिल्ली)
१२ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या कुटूंबांची प्रतिक्षा आता संपणार आहे. पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी २७ जुलैला आज पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता ट्रान्सफर करणार आहे.. पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळानुसार ८.५ कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात १७ हजार कोटी रुपये जमा होणार आहेत. याचाच अर्थ आज अंदाजे साडे तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
केंद्र आणि राज्य सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी गेल्या महिन्यात काही कठोर निर्णय जाहीर केले. या निर्णयामुळे पीएम किसानच्या लाभार्थ्यांची संख्या घटली आहे. एप्रिल ते जूलै २०२२-२३ चा हप्ता ११.२७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. पण आॅगस्ट ते नोव्हेंबर २०२२-२३ मध्ये केवळ ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा झाला. ही संख्या २०२२-२३ मध्ये ८.८० कोटी होती. याचाच अर्थ फसवणूकीच्या बाबींचा परिणाम आता दिसू लागला आहे.