(लांजा)
तालुक्यातील गवाणे-करंबेळेवाडी येथे विद्युतभारीत वाहीनी तुटल्याने एका मुक्या जनावराला प्राण गमवावा लागला. या घटनेत संबंधित शेतकऱ्याचे 21 हजार रुपये चे नुकसान झाले आहे. गवाणे – करंबेळेवाडीतील अनंत सखाराम करंबेळे यांनी बुधवारी सकाळी 7.30 वाजता गुरे चरायला सोडली. गोठ्यापासुन काही अंतरावर विद्युत भारीत तुटून पडलेली तारेचा धक्का लागुन बैलाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबतची माहिती पोलीस पाटील रवींद्र कोटकर, महावितरण कंपनीच्या कार्यालयात देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच महावितरण चे शाखा अभियंता श्री.वड्डा, तलाठी चरणसिंग मरमठ यांनी धाव घेत पंचनामा केला आहे. या घटनेत शेतकऱ्याचे 21 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.