(खेड)
सोमवार दि. २४/७/२०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड व पर्शुराम हॉस्पिटल व रीचर्स सेंटरचे डॉ.निकिता जाधव, डॉ उमेश पाईकराव, डॉ.अनंत हिप्परर्गिकर यांच्या माध्यमातुन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा मा.नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री . शैलेश गायकवाड (महाराष्ट्र सैनिक) यांच्या प्रयत्नाने शहरातील पुरबाधित भागातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या मोफत आरोग्य तपासणीला खेड च्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष तथा चिंचघर गावचे तंटामुक्त अध्यक्ष गणेश सुर्वे, शहराध्यक्ष श्री. ऋषिकेश कानडे, मनविसे मा. जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी, शहर उपाध्यक्ष चेतन धामणकर, शहर उपाध्यक्ष संदीप सासणे, रोहन उर्फ भैयु भोजने, शहर सचिव केदार वणजू , मा. नगरसेविका तथा मा. गटनेत्या अरुणाभाभी कानडे, महिला सेना शहर उपाध्यक्षा मिनल गांधी, वाहतूक सेना शहर संघटक विशाल कापडी, विशाल (बावा) खेडेकर, रिक्षा सेना जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, निनाद गांधी, राहुल प्रभू,अतुल शिंदे, व इतर महाराष्ट्र सैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी हे उपस्थित होते.