(रत्नागिरी)
धकाधकीच्या जीवनात विसरत चाललेली नाती, सर्वजण पुन्हा परत एकत्र यावेत यासाठी चाललेला आटापिटा आणि एकत्र आल्यानंतर नात्यांमधली प्रेमळ भावनिक गुंतवणूक असा सुंदर चित्रपट केदार शिंदे या नेहेमीच काहीतरी वेगळे देणाऱ्या मराठी उमद्या माणसाने बनवला आहे. हा चित्रपट आल्यापासूनच तो बघण्यासाठी मराठी आणि अन्य भाषिक प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली आणि विशेष म्हणजे महिलांनी हा चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी केली आहे. त्यामध्येच चित्रपट गृहात लक्ष वेधून घेतलं हातखंबा येथील चक्क एका ९५ वर्षाच्या आजी श्रीमती सुनंदा शंकर मापुस्कर यांनी.
त्यांना या चित्रपटाबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही लगेच रत्नागिरीतील चित्रपटगृह आपल्या मुलांना आणि नातवंडाना घेऊन गाठला आणि पूर्वीच्या एकत्र कुटुंबातली असलेली मज्जा एकत्र कुटुंबियांना घेऊन चित्रपट बघुन अनुभवली. आजींना चित्रपट एवढा आवडला की, त्या म्हणाल्या आमच्या वेळची एकत्र कुटुंब पद्धत किती छान होती. त्या सर्व आठवणी आज हा चित्रपट पाहून पुन्हा जाग्या झाल्या. आजीचा उत्साह बघुन आजही वाटत “बाईपण लय लय भारी देवा”