(रत्नागिरी)
स्फोटके भरलेला टँकर रत्नागिरी ते मुंबई असा जाणार असल्याचा पोलिसांना निनावी फोन आला. मात्र तो फोन केवळ अफवाच ठरली असल्याचे स्पष्ट झाले आहे.सदर टँकर बावनदी येथे पोलीसांनीपकडुन टँकरचा तपास केला. मात्र कोणत्याही संशयास्पद वस्तू सापडल्या नाहीत.
रविवारी सकाळी पोलिस कंट्रोल रूमला निनावी फोन करणाऱ्याने मुंबई – गोवा महामार्गावरूठिकाणीन स्फोटके भरलेला टँकर जाणार असल्याची माहिती दिली होती. या फोनमुळे पोलिस विभागाने जिल्ह्यातील सर्व तातडीने नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान एक टँकर संगमेश्वर येथे पोलिसांकडून थांबवण्यात आला. टँकर चालकाची चौकशी आणि टँकरची बॉम्ब शोध व नाशक पथकाकडून झडती घेतल्यावर टँकरमध्ये कोणतीही स्फोटके आढळून आलेली नाही. त्या टँकरमध्ये पॉलिथिन बनवण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले आहे. मात्र हा फोन येताच पोलिसांची चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.